वाचनाने जीवन जगण्याचा मार्ग समृध्द होतो - राजेंद्र पाटील अभिवाचन स्पर्धेचा ऑनलाईन बक्षिस सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2020

वाचनाने जीवन जगण्याचा मार्ग समृध्द होतो - राजेंद्र पाटील अभिवाचन स्पर्धेचा ऑनलाईन बक्षिस सोहळा


तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

' पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही. ही किमया फक्त वाचनानेच होऊ शकते. वाचनानेच जीवन जगण्याचा मार्ग समृध्द होऊ शकतो. आपण गेल्यावर लोकांनी आपणास विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम केले पाहिजे. एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा. " असे प्रतिपादन राजेंद्र पाटील यांनी केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्तआयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धच्या ऑनलाईन बक्षिस वितरण समारंभात  प्रमुख पाहुणे .म्हणून बोलत होते.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत एम.एन. शिवणगेकर यांनी केले.परिचय एस.पी. पाटील यांनी करून दिला. पुण्याच्या प्रसिद्ध कथाकथनकार कल्पना देशपांडे यांनी या स्पर्धचे परीक्षण केले.
या स्पर्ध मध्ये एकूण ९६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. 
एच.आर. पाऊसकर यांनी निकाल घोषित केला.मोठया गटात अनुक्रमे अनुराधा शिरगावकर, सृष्टी पाटील, निकिता मेणसे, दर्शना वाके, अस्मीता माडखोलकर, दिक्षा पाटील, शिवानी यमटेकर तर लहान गटात मधुरामुरकुटे, शिवानी पाटील, श्रावणी पाटील, प्रतिक्षा देसाई, जान्हवी पाटील, दिया बसर्गेकर  या विद्यार्थांनी यश मिळविले.
           चंदगड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. सुमन सुभेदार यांनी अभिवाचन उपक्रमाचे कौतूक करून असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना वाचनाची ,आवड निर्माण करतात असे सांगितले.
प्राचार्य ए.एस. पाटील यांनी विद्यार्थी जीवनातील वाचनाचे महत्त्व आघोरेखित केले.
यावेळी अनुराधा शिरगांवकर सृष्टी पाटील, मधुरा मुरकुटे, शिवानी पाटील, श्रावणी पाटील या विद्याथ्र्यांची मनोगते झाली .एम.व्ही.कानूरकर,सौ. दिपा बल्लाळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला एम.टी. कांबळे, सुभाष सावंत, आर.आय. पाटील, वाय. व्ही. कांबळे, टी. एल. तेरणीकर व बहुसंख्येने मराठी विषय शिक्षक  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पाटील यांनी तर आभार व्ही.एल. सुतार यांनी मानले.

No comments:

Post a Comment