गारगोटी तहसीलदारांना थुंकी मुक्त शहर बाबत निवेदन देताना मराठा सेवा संघ व अन्य संघटनांचे पदाधिकारी. |
गारगोटी : सी. एल. वृत्तसेवा
वैद्यकीय शास्त्राच्या निष्कर्षानुसार अनेक रोगांचा प्रसार हवेतून होतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गुटखा, तंबाखू खाऊन थुंकल्यास अथवा ठराविक रुग्णांच्या थुंकणयाने आजाराचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. शहरात ठिकठिकाणी थुंकण्याची सोय करावी. अशी मागणी भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी वरुटे- आडसुळ यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आले. डॉ. राजीव चव्हाण यांनी तहसिलदार यांना शाहुजी महाराज यांचा चरित्र ग्रंथ देऊन स्वागत केले. तर शहाजी देसाई यांनी मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. या अभियानात जनजागृतीसाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन मराठा सेवा संघ व इतर कक्षांच्या प्रमुखांनी दिले. यावेळी डॉक्टर जयश्री चव्हाण, शहाजी देसाई, राजेंद्र रत्नाबाई बळवंत, सुनील चव्हाण, मानसिंग देसाई, प्राजक्ता देसाई, शिवाजी देसाई इत्यादी मान्यवर हजर होते.
No comments:
Post a Comment