सुंडीचे सीआरपीएफ जवान संजय कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2020

सुंडीचे सीआरपीएफ जवान संजय कांबळे यांचे निधन

संजय कांबळे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          सुंडी (ता. चंदगड) येथील सीआरपीएफचे जवान संजय परसु कांबळे (वय 45) यांचे झारखंड येथे ड्युटीवर असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई असा परिवार आहे. सुंडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्काराप्रसंगी गडहिंग्लज उपविभागाचे डीवायएसपी इंगळे, पीएसआय पवार, आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रनावरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment