चंदगड कोविड सेंटरमधील योध्दांचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2020

चंदगड कोविड सेंटरमधील योध्दांचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गौरव

चंदगड कोविड सेंटरमधील कोविड योध्दांचा सत्कार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित कोविड सेंटरमधील अधिकारी व कर्मचारी.

चंदगड / प्रतिनिधी

           संपुर्ण देशासह जगात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही आहेत. त्यामुळे सर्वांच्या मनात कोरोना विषयी भिती आजही आहे. तरीही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत रुग्णांची अहोरात्र सेवा करुन या रोगातून अनेकांना बरे करणाऱ्या चंदगड येथील कोविड सेंटरमधील कोरोना योध्दांचा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

चंदगड कोविड सेंटरमध्ये कोविड योध्दांचा सत्कार करताना.

        स्वतःचा व पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या कोव्हिड सेंटर मधील डॉक्टर प्रमुख, नर्सेस, वॉर्डबॉईज ते अगदी ॲबुलन्स ड्रायव्हर योद्धांचा शाल देवून यथोचीत मानसन्मान व गौरव आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, अली मुल्ला यांच्यासह कोविड सेंटरमधील कर्मचारी उपस्थित होते. 
No comments:

Post a Comment