चंदगड नगरपंचायतीतर्फे कोरोना'वर चित्रकला स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2020

चंदगड नगरपंचायतीतर्फे कोरोना'वर चित्रकला स्पर्धा

चंदगड / प्रतिनिधी

          चंदगड  नगरपंचायतीने ' माझे कुटुंब , माझी जबाबदारी ' व कोरोना जनजागृतीसाठी खुली चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या पाच उत्कृष्ट स्पर्धकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी ही माहिती दिली. समज - गैरसमज, सामाजिक स्थिती, कोविड -१ ९ योद्ध्यांचे योगदान, कोविड -१ ९ होण्याचे कारण व प्रतिबंधात्मक उपाय , कोविड -१ ९ मुक्त रुग्णांचे मनोगत या पाच विषयांपैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. त्यासाठी ३८ बाय २८ सेंमीचा कागद वापरावा. कागदाच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात स्पर्धकाचे नाव, वय, प्रभाग क्रमांक, मोबाईल नंबर लिहावा. प्रथम चार स्पर्धकांना अनुक्रमे १०००, ७०१, ५०१, २५१, तर उत्तेजनार्थ २५१ रुपयांचे बक्षीस आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून चंदगड शहरापुरती मर्यादित आहे. स्पर्धकांनी काढलेली चित्रे चंदगड अर्बन बँकेच्या कार्यालयात २७ तारखेपर्यंत जमा करावीत. ३१ तारखेला निकाल जाहीर करून बक्षीस वितरण होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, तसेच प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment