राधा शुगर फराळे कारखान्याने 384 प्रमाणे शिल्लक हप्ता न दिलेस उग्र आंदोलनाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2020

राधा शुगर फराळे कारखान्याने 384 प्रमाणे शिल्लक हप्ता न दिलेस उग्र आंदोलनाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा

राधानगरी येथील राधा शुगर फराळे कारखान्यांने एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय राजगोळे यांना निवेदन देताना भाजप तालुका उपाध्यक्ष नितीन फाटक,  ऊस उत्पादक शेतकरी.

चंदगड / प्रतिनिधी

         राधानगरी येथील राधा शुगर फराळे च्या २०१८/१९ गळीत हंगाम मधील  384 प्रमाणे शिल्लक हप्ता अद्यापही शेतकऱ्यांना दिला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कारखान्याने शिल्लक हप्त त्वरीत द्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

       चंदगड तालुक्यातील दौलत शुगर कारखाना बंद होता. तालुक्यामध्ये उसाचे प्रमाण जास्त असल्याने अनेक बाहेरचे कारखान्याची चंदगड तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला. त्यामध्ये राधा शुगर फराळे (ता. राधानगरी) शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पाठवला. कारखान्याने काही बिल लवकर काढली व लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. त्यानंतर गेली 3 वर्षे हजारो शेतकऱ्यांनी कारखान्याशी संपर्क साधला. अनेकदा फेऱ्या मारल्या मात्र आतापर्यंत एफ. आर. पी. ची रक्कम अजुनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नाही. कारखाना प्रशासनाने चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना बंद पडल्याचा गैरफायदा घेतोय की काय अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येवुन बैठक घेवून चर्चा केली व निवेदनाच्या माध्यमातून चंदगडचे तहसिलदार यांचेकडे निवेदन दिले.

            कारखाना प्रशासनाशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिल जातात. यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष नितीन फाटक, आमरोळीचे सामाजिक कार्यकर्ते जोतिबा कदम, तुकाराम खोराटे,  तुकाराम पाटील,  रमेश पाटील, चंद्रकांत खोराटे, अशा अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून राहिलेली एफआरपी त्वरित देण्यासाठी मागणी केली आहे.  एफआरपी लवकर न दिल्यास कारखाना प्रशासनावर गुन्हे नोंद करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

No comments:

Post a Comment