पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयाच्या कर्मचाऱ्यांचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2020

पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयाच्या कर्मचाऱ्यांचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून कौतुक

             आमदार ऋतुराज पाटील रुग्णांलयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना, यावेळी                        उपस्थित रुग्णांलयातील अधिकारी व कर्मचारी 

चंदगड / प्रतिनिधी

      कोल्हापुरातील जिल्ह्याचे सीपीआर रुग्णांलय हे कोरोना काळात कोविड-19 रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा भार सेवा रुग्णांलयावर आला. या कठीण काळातही सेवा रुग्णांलयाने रुग्णांना दिलेली आरोग्य सेवा ही कौतुकास्पद आहे असे कौतुकाचे उद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले.

नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार कोल्हापुरातील रुग्णांलयाला मिळाला. या प्रकारचा पुरस्कार मिळवणारे हे रुग्णांलय जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या रुग्णांलयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी,  सेवा रुग्णांलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम,  माजी महापौर स्वाती येवलुजे,  नगरसेविका माधुरी लाड,  नगरसेवक अशोक जाधव,  मोहन सालपे,  सुभाष बचडे, श्री राम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे,  उद्योजक डी. डी. पाटील, डॉ. डी. पी. वाडकर यांच्यासह सेवा रुग्णांलयातील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment