काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई (शिरोलीकर) यांचा शनिवारी किणी कर्यात भागात नुकसान पाहणी दौरा - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2020

काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई (शिरोलीकर) यांचा शनिवारी किणी कर्यात भागात नुकसान पाहणी दौरा

संभाजीराव देसाई-शिरोलीकर

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

            चंदगड तालुका काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष मान. संभाजीराव उर्फ विठ्ठलराव बाबासाहेब देसाई (शिरोलीकर) यांचा केंद्रातील सत्ताधारी भा.ज.प.सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश पातळीवर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सह्यांची देश व्यापी मोहीम राबविणे , चार दिवसां- पुर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान.नाम.सतेज उर्फ बंटी डी.पाटील साहेबांनी प्रशासनाला चंदगड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे योग्य आणि पारदर्शकपणे करण्याबाबत आदेश दिले आहेत , तेंव्हा माननीय पालकमंत्री साहेबांच्या आदेशा नुसार प्रशासना कडुन सुरू असलेले पंचनामे योग्य प्रकारे सुरू आहेत का याची शहानिशा करणे , काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनते पर्यंत पोहचवणे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासना कडुन भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधुण त्याच्या अडचणी समजाऊण घेण्यासाठी किणी- कर्यात भागात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

              शनिवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासुण किणी , नागरदळे , कडलगे बु., कडलगे खुर्द , ढोलगरवाडी , सुंडी ,करेकुंडी , मांडेदुर्ग , मौजे कारवे  या भागांत दौरा आयोजित केला आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी , पदाधिकारी यांनी आप-आपल्या गावांतील   शेतकऱ्यांना घेऊन दौऱ्याच्या ठिकाणी उपस्थितीत रहावे . असे आवाहन चंदगड तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment