किटवाड येथे शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2020

किटवाड येथे शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

कागणी : सी. एल. प्रतिनिधी 

        किटवाड (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ज्ञान, सेवा, त्याग युवक मंडळ  व गडहिंग्लज येथील अण्णासाहेब गळतगे लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 23 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लबचे संपर्क अधिकारी राजू कुंभार व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. किटवाड येथील ब्रह्मलिंग मंदिराच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता शिबिराला प्रारंभ होईल. कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासनाचे निर्देश पळून सदर शिबिर आयोजित केले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन केले होते, की राज्यभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलनात घट झाली आहे, त्यामुळे युवक मंडळाने नवरात्र तसेच दसऱ्यानिमित्त रक्तदान शिबिरे भरवून राज्याच्या आरोग्य खात्याला तसेच रुग्णांना मदत करावी या उद्देशाने मंडळाने प्रयत्न करावेत. त्याला प्रतिसाद देत ज्ञान, सेवा, त्याग मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.



No comments:

Post a Comment