जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे सोबत आमदार राजेश पाटील यांची विविध प्रश्नावर चर्चा, कामे मार्गी लावण्याचे आश्वासन - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2020

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे सोबत आमदार राजेश पाटील यांची विविध प्रश्नावर चर्चा, कामे मार्गी लावण्याचे आश्वासन

जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या सोबत मतदारसंघातीत विविध प्रश्नावर चर्चा करताना आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा 

     चंदगड-आजरा-गडहिंग्लज मतदारसंघातील अपूर्ण कामांच्या व प्रश्नाबाबत  जलसंपदा मंत्री  जयंतराव पाटील  यांच्या सोबत  आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी सविस्तर सकारात्मक चर्चा केली. यात प्रामुख्याने - उचंगीचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी वाढीव दाइत्वाची पूर्तता येत्या 15 ते 20 दिवसात मंजुरी देण्यात येईल.

           किटवडे (ता. आजरा) येथील स्थगित केलेल्या 3 टि.एम.सी प्रकल्पाचे वनविभागाची ना हरकत चा प्रस्ताव नागपूर येथे प्रलंबित असून व चंदगड, आजरा, गडहिंग्लज साठी 7 टि.एम.सी पेक्षा जास्त पाणी अडवल्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्याकारणाने नवीन लवादाने महाराष्ट्राच्या वाट्याला 81 टि.एम.सी मधून  चंदगड, आजरा, गडहिंग्लज करीता किमान 5 टि.एम.सी चे प्रयोजन करण्याकरीता मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सदरचा प्रकल्प पूर्ण झाल्यास

- महागाव येथील रामतीर्थ झऱ्याचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गडहिंग्लज पूर्व भागाच्या शेतीला पाणी देण्याच्या बाबत सर्वेक्षण  करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

- तिलारी जलविद्युत प्रकल्पातील 3 बंधारे वनविभागाच्या परवानगी मुळे सध्या प्रलंबित असून ,सदरचा वनविभागाचा ना हरकत दाखला प्राप्त करून , साठलेले पाणी वीजनिर्मिती साठी न वापरता चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्याची मागणी केली व त्याच बरोबर मार्केडेय नदीच्या माध्यमातून लगतच्या सीमाभागातील शेतकऱ्यांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देता येईल याकामी कर्नाटकाच्या मा.पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी  यांनी सूचित केल्या प्रमाणे दोन्ही राज्यांमध्ये करार करून सदर प्रकल्पासाठी होणार खर्च दोन्ही राज्यांनी समान करावा असे ठरले.

- शेवाळे व नांदवडे (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीवर कोल्हापूर टाइप बंधारा स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणी अनुसार पाटबंधारे नियमानुसार बांधता येत असल्यास सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच कोरडवाहू गाव असणाऱ्या तेऊरवाडी (ता. चंदगड) या गावाला घटप्रभा लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतची चर्चा मंत्री महोदयांच्या सोबत झाली. यासंदर्भात लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे अभिवचन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यानी आमदार राजेश पाटील याना दिले. मतदारसंघातील सर्व प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री श्री. पाटील यानी दिल्याने आमदार राजेश पाटील यांनी आभार मानले.

                                     

No comments:

Post a Comment