नुकसानग्रस्त भागातील पिक नुकसानीची काँग्रेसच्या वतीने पाहणी, नुकसानीचा पालकमंत्र्याना देणार अहवाल - संभाजीराव देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2020

नुकसानग्रस्त भागातील पिक नुकसानीची काँग्रेसच्या वतीने पाहणी, नुकसानीचा पालकमंत्र्याना देणार अहवाल - संभाजीराव देसाई

काँग्रेसचे चंदगड  तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई  शिरोलीकर नुकसानीच्या पाहणीसाठी प्रत्यक्ष शेतातील पिकात जावून पाहणी करताना. 

चंदगड / प्रतिनिधी

          परतीच्या वळवी पावसाने चंदगड तालुक्यात झालेल्या नुकसानीची  काँग्रेसचे चंदगड  तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई  शिरोलीकर यांनी प्रत्यक्ष शेतकर्याच्या बांधांवर जाऊन पहाणी केली. कळसगादे, पार्ले,जेलुगडे,पाटणे,आंबेवाडी,मोटणवाडी,माडवळे भागाचा दौरा करून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व नूकसानीची स्थिती जाणून घेतली. पालकमंत्री सतेज पाटील याना नूकसानीचा अहवाल देणार असल्याचे  यावेळी देसाई यांनी सांगितले.

          गेल्या आठवड्याभरापासून परतीच्या पावसाने चंदगड तालुक्यात थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे भात, ऊस, भुईमूग, नाचना, रताळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची बुधवारी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी केली. या वेळी  उदय देसाई, महादेव वांद्रे, महादेव मंडलिक, जयवंत शिंदे, तुकाराम पाटील, अमृत कांबळे, संदीप गोरल, अर्जुन सुतार, प्रकाश इंगवले, सुधाकर बांदिवडेकर, खेमाना दळवी, नंदु गावडे, सोमु गावडे आदीसह शेतकरी  व कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment