![]() |
| अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये मदत द्यावी या मागणीचे निवेदन चंदगडचे तहसिलदार यांना देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी. |
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजार रुपयांची रक्कम जमा करावी. विमा कंपन्यांना पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्याबाबचे आदेश देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जाहिरात
![]() |
| जाहिरात |
मागील वर्षी झालेल्या महापुराने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे उत्पादन घटले. बोगस बियाणामुळे देखील शेतकर्यांचे नुकसान व फसवणूक झालेली आहे. त्यातच मागील महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. या हंगामामध्ये पिके चांगली आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करण्यात वेळ वाया घालवू नये. भरपावसात भात पिकांची कापणी व मळणी सुरु आहे. मग पंचनामा कशाचा व कसा करणार?, त्यामुळे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर चंदगड तालुका अध्यक्ष सुशांत नौकुडकर, कोल्हापूर जिल्हा महानगर उपाध्यक्ष डॉ. नामदेव निट्टुरकर, चंदगड तालुका उपाध्यक्ष सुमित रेडेकर, सरचिटणीस कृष्णा गावडे या पदाधिकार्यांसह रामचंद्र पवार, नेताजी राजगोळकर, साहिल पाटील या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.



No comments:
Post a Comment