पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते निट्टूर येथे कृष्णा कांबळे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2020

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते निट्टूर येथे कृष्णा कांबळे यांचा सत्कार

कृष्णा कांबळे यांचा सत्कार करताना पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, विद्याधर गुरबे.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका काँग्रेस चे नेते  कै.सुरेशराव चव्हाण पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता कृष्णा कांबळे यांची चंदगड तालुका संजय गांधी निराधारच्या कमिटीवर सदस्यपदी निवड  झालेबद्दल निट्टूर ता. चंदगड येथे पालकमंत्री  नामदार  सतेज सतेज ऊर्फ बंटी .डी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जाहिरात
जाहिरात

        कृष्णा कांबळे यांना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री पाटील  म्हणाले  कै.सुरेशराव  चव्हाण - पाटील यांचे निष्ठावंत काँग्रेस  कार्यकर्तेस संधी दिली आहे . यामुळे यांचा चंदगड तालुक्यातील वंचित लाभार्थी जे आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कमिटीने एक मोहीम हाती घ्यावी. वंचित राहिले लोक ,काही. लोकांचे प्रस्ताव त्रुटींमुळे अपूर्ण आहेत, काही लोक अपंग आहेत पण त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही, अशा लोकांना वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य अपेक्षित आहे. विधवा,  परितक्त्या यांचेही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. त्रुटी दूर करुन प्रकरणे मार्गस्थ लावणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठी समाजसेवा होऊ शकते.

         वंचिताना अर्ज कसा आणि कोठे करावा याची माहिती नसते. त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती इत्यादी गोष्टी वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे.  तलाठी त्याचबरोबर इतर शासकीय अधिकारी वर्गाकडून जे दाखले मिळणे आवश्यक आहेत ते विनाविलंब मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देऊन त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,  हे काम कमिटीने लगेच हाती घेतले पाहिजे. शासनाच्या समाधान योजणेसारख्या योजणेची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. लाभार्थी कोण असु शकतात व या योजनेच्या अटी व नियमांचे माहितीपत्रक  छापून गावपातळीवर प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहचले पोहचवा . आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर ठराविक जबाबदाऱ्या देऊन प्रत्येक वंचितापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

        निराधार वंचित लोकांना शासनाच्या या योजनेचा चांगल्या प्रकारे  उपयोग होईल असे काम करा असे  आवाहन पालकमंत्री पाटील यानी केले. यावेळी  आमदार राजेश पाटील , कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे  सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई- शिरोलीकर, विक्रम सुरेशराव चव्हाण पाटील, निट्टूर गावांचे सरपंच अमोल सुतार व ग्रामस्थ  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment