काँग्रेस तालुकाध्यक्षांकडून बुधवारी चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2020

काँग्रेस तालुकाध्यक्षांकडून बुधवारी चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

संभाजीराव देसाई (शिरोलीकर)

चंदगड / प्रतिनिधी

             चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई हे चंदगड तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी व पीक नुकसानीचा पाहणी दौरा करणार आहेत. बुधवार दि. २१ रोजी  दुपारी २ वाजता कळसगादे, पार्ले, जेलुगडे, व पाटणे या भागात लोकांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा व नुकसानग्रस्त पिकांचे होणारे पंचनामे याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे होत असलेले अधिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे अशा प्रकारच्या सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment