कोरोनाच्या संकटामुळे.......तब्बल सहा महिन्यानंतर बैठक, गटसचिवांच्या समस्या आणि कामकाजाच्या अडीअडचणीवर चर्चा, चंदगड येथे बैठक उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2020

कोरोनाच्या संकटामुळे.......तब्बल सहा महिन्यानंतर बैठक, गटसचिवांच्या समस्या आणि कामकाजाच्या अडीअडचणीवर चर्चा, चंदगड येथे बैठक उत्साहात

चंदगडचे  नूतन सहाय्यक निबंधक म्हणून एस. के. ठाकरे यांचा चंदगड तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विलास नार्वेकर सत्कार करताना. शेजारी महादेव पाटील, शिवाजी पाटील, कलाप्पा कोळी, जयवंत कुंभार.
 

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड तालुका गटसचिव, सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हा बँक यांची संयुक्त सभा चंदगड येथे सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये उत्साहात पार पडली. या कोरोना महामारीमुळे गेले सहा महिने सदर सभा होवू शकली नव्हती. 

          प्रारंभी गेल्या सहा महिन्यात मृत्यू पावलेल्या तालुका गटसचिव संघटनेच्या सदस्यांना आणि त्यांच्या नातेवाइकांना आदरांजली वाहण्यात आली. ज्यामध्ये राजू पाटील यांच्या मातोश्री, सेवा निवृत्त सहकारी बाबु मुल्ला, राजू कोकीतकर यांचे वडील, अप्पा  देसाई यांचे वडील, तसेच अकबर सय्यद यांच्या मातोश्री यांना सभेपूर्वी आदरांजली वाहून सभेच्या कामकाजाला सुरवात झाली. आदरांजलीचा प्रस्ताव गटसचिव संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विलास नार्वेकर यांनी मांडला.

          चंदगड तालुक्याचे नूतन सहाय्यक निबंधक म्हणून एस. के. ठाकरे यांनी नुकताच पदभार स्विकारला. त्या निमित्ताने तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना जागतीक महामारी संकटामूळे गेल्या सह महिन्यात सभा होवू न शकल्याने या सभेत गेल्या सहा महिन्यातील कामकाजाचा आढावा सह्हायक निबंधक एस. के. ठाकरे व विभागीय अधिकारी जयवंत कुंभार यांनी घेतला. यावेळी गटसचिवांच्या समस्या आणि कामकाजाच्या अडीअडचणी सहाय्यक निबंधक एस. के. ठाकरे तसेच विभागीय अधिकारी यांनी जाणून घेतल्या.

            या सभेला चंदगड गटसचिव संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, गटसचिव सेवक पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील, जिल्हा संघटना सदस्य गणपत बिर्जे, रामा गावडे, नारायण निचम, निवृत्ती पाटील उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक गटसचिव संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास नार्वेकर यांनी केले. गटसचिवांच्या समस्या शिवाजी पाटील यांनी मांडल्या तर आभार मनोहर पाटील यांनी मानले.




No comments:

Post a Comment