चंदगड तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2020

चंदगड तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांची निवड

 

संभाजीराव देसाई-शिरोलीकर

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी संभाजीराव देसाई -शिरोलीकर (रा. शिरोली) याची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र  कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय  काँग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री  सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी श्री.देसाई यांना दिले. 

चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांना निवडीचे पत्र देताना

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पालकमंत्री तथा गृहमंत्रीराज्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील व इतर मान्यवर.

         यावेळी  कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व आजरा-गडहिंग्लज -चंदगड समन्वयक विद्याधर गुरबे , विक्रम सुरेशराव चव्हाण-पाटील, महादेव वांद्रे, जयसिंग पाटील, चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर, अशोक दाणी, उदय देसाई, जयवंत शिंदे, तुकाराम पाटील, पांडुरंग ल्हासे, रुक्माणा पाटील, शिवाजी यादव, नामदेव नार्वेकर, कलीम मदार, प्रसाद वाडकरसह चंदगड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील दुरावलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून राष्ट्रीय काँग्रेस तालुक्यात मजबूत करणार असल्याचे निवडीनंतर संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment