खोटी कागदपत्रे सादर करून दौलत-अथर्वची आठ लाखांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2020

खोटी कागदपत्रे सादर करून दौलत-अथर्वची आठ लाखांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी या कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी वाहने लावतो असे सांगून अॅडव्हन्स  रक्कम घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी विक्रम शिवाजी पाटील व देवयानी विक्रम पाटील रा. दिंडेवाडी (ता. भुदरगड) या पती-पत्नी  विरोधात चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

        याबाबत अधिक माहिती अशी कि, ``विक्रम पाटील व देवयानी पाटील यानी MH 04 EL 8103 व KA22 A 4698 या वाहनांची कागदपत्रे सादर करून दौलत-अथर्व कारखान्याला सन २०१९-२० या हंगामात ऊस पुरवठा करण्यासाठी  प्रत्येकी दोन्ही वाहनावर चार लाख याप्रमाणे आठ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणुन रक्कम उचल केली होती. पण कराराप्रमाणे ऊस वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध केलेच नाही. करारावेळी उपलब्ध केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आलेने दौलत - अथर्व वसुली विभागाचे राजेंद्र पाऊसकर यांनी या दोघा-विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार या  दोन आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा चंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सातपुते करत आहेत.No comments:

Post a Comment