प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन वसंत जोशिलकर यांना पत्नीवियोग - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2020

प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन वसंत जोशिलकर यांना पत्नीवियोग

सुगंधा वसंत जोशिलकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

             किणी (ता. चंदगड) येथील सुगंधा वसंत जोशिलकर (वय 64) यांचे हृदयविकाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे चंदगड तालुका कार्याध्यक्ष, किणी ग्रामपंचायत माजी सदस्य, चंदगड केंद्राचे निवृत्त केंद्रप्रमुख वसंत जोशिलकर यांच्या त्या पत्नी होत्या. अभियंता रणजीत जोशिलकर, शिनोळी येथील अटलास कंपनीचे ऑपरेटर विश्वजीत जोशिलकर, वास्को येथील विमानतळाचे सुरक्षा कर्मचारी अजित जोशिलकर यांच्या त्या मातोश्री तर एअर इंडियाचे ऑपरेटर भगवान जोशिलकर यांच्या त्या भावजय होत्या. अंत्यविधी रविवारी दि. ११ रोजी सकाळी तर रक्षाविसर्जन सोमवार दि. १२ रोजी होणार आहे.No comments:

Post a Comment