अथर्व (दौलत) पूर्ण क्षमतेने सूरू होणार, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2020

अथर्व (दौलत) पूर्ण क्षमतेने सूरू होणार, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

दौलतचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)

        तालुक्याच्या विकासातील आर्थिक नाडी असलेला दौलत साखर कारखाना सन २०२०-२०२१ या गळीत हंगामात पूर्णं क्षमतेने सूरू होणार असल्याने शेतकरी, कामगारां बरोबर च तोडणी वाहतुकदार, छोटे-मोठे व्यापारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

        डोंगराएवढ्यया कर्जाच्या ओझ्याखाली  सापडलेल्या ‘दौलत’ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला १५ / १६तारखेला सुरवात होत आहे.  प्रारंभ होणार आहे. पाच वर्षानंतर पुन्हा दौलतची चाकं गेल्या वर्षीपासून फिरु लागली आहेत. दौलतने गेल्यावर्षी  फक्त ट्रायल हंगाम म्हणूनच घेतला, यावेळी मात्र तो पूर्ण ताकदीने स्पर्धेत उतरणार आहे. तब्बल ७ लाख टन गाळपाचे 'टार्गेट'  कारखाना प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे ओलम  ( हेमरस) राजगोळी आणि इको केन म्हाळुंगे या दोन साखर कारखान्यांना ऊस मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा करावी लागणार आहे.

        तालुक्याच्या आर्थिक विचाराबरोबरच राजकारणाचा अड्डा बनवलेल्या दौलत कारखान्यातून एक वेळ सोन्याचा धूर निघत होता.पण राजकरणासाठी एक कल्ली वापर झाल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दौलतची सूवर्ण कारकिर्द झाकाळली गेली.कोट्यावधी चे कर्ज झाल्याने अखेर दौलत बंद पडली.शेतकरी,कामगार व त्यावर अवलंबून असणार्या सर्वच घटकावर बेकारीची कू-हाड कोसळली.पण गत सालापासून अथर्व कंपनीने दौलत चालवायला घेऊन पून्हा एकदा शेतकरी कामगारात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आपली हक्काची दौलत सुरू होणार म्हणून शेतकरी आणि कामगारांच्याही चेहर्‍यावर हसु फुलले आहे. फटंग आणि ओसाड पडलेला दौलतचा परिसर पुन्हा माणसांच्या वर्दळीने फुलून गेला आहे.  

          तालुक्यात सुमारे १२ लाखाहून अधिक टनेज उसाचे उत्पादन होते. पैकी ७ लाख दौलत गाळप करणारच असा विश्वास अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांनी बोलून दाखवला आहे. तसेच ओलाम राजगोळी कारखान्याचे युनिट हेड भारत कुंडल यांनीही ७ लाख टनाचे टार्गेट ठेवले आहे. तसेच म्हाळुंगे कारखान्याने ४ टनाचे टार्गेट गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या स्थानिक तीन कारखान्यांचे मिळून १८ लाख गाळप होणार असल्याने तालुक्यातील ऊसाची पळवापळवी होणार आहे. एकंदरीत यावेळी शेतकऱ्यांना सुगीचे दिवस  येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऊसाचे योग्य आणि समाधानकारक वजन, आणि प्रति टन जादा दर देणाऱ्या कारखान्याला शेतकरी ऊस पाठवणार आहेत. तसेच तोडणी कामगारांकडूनही होणाऱ्या  लूटीलाही  यावेळी काही प्रमाणात चाप बसेल असा जाणकार अंदाज बांधत आहेत.  

         अथर्व कंपनीने हंगाम सुरु करण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून युध्दपातळीवर काम चालवले आहे. यावर्षी कारखाना सुरु झाला नसता तर लिक्विडेशन मध्ये जाण्याची भिती होती. कुणाच्याही कोंबड्याने दिवस उजाडण्याची वाट शेतकरी आणि कामगार पहात होते. 67 कोटीच्या थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने दौलतचा ताबा घेतला होता. दौलत चालवण्यास देण्यासाठी १२ वेळा निविदा काढूनही कुठल्याही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. सदर कंपनीने धाडस दाखवल्याने तालुक्यात चैतन्याचे वातावरण पसरले.  ओसाड पडलेल्या दौलतच्या माळावर आता माणसांची गर्दी दिसू लागली आहे.  हलकर्णीफाट्यावरील व्यापार्‍यांचे बंद पडलेले धंदे पुन्हा तेजीत आले आहेत. तसेच कामगारांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे राहिले आहेत. कामगार वसाहतीचे गल्ली बोळ माणसांनी भरले आहेत.  स्वार्थी आणि मतलबी राजकारण्यांमुळेच दौलतची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे कारखाना बंद राहण्यापेक्षा सुरु झाला तर काय वाईट आहे अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी बोलून दाखवल्या. सामान्यांना दौलत चालु झाला पाहिजे असे वाटत होते. अखेर दौलत सुरु झाल्याने शेतकरी व कामगारात उत्साहाचे  वातावरण पसरले आहे. 

दौलत कारखान्याला स्थापनेपासून बैलगाडीद्वारे ऊस पाटवत आहे.बैलगाडीतून ऊस गेल्याने ऊसा च  वजन नेमके किती येते याचा अंदाज येत असतो,  वजनात फसवणूक होत नाही.त्यामुळे आमचा व आमच्या नातेवाईकांनी पिकवलेला  संपूर्ण ऊस दौलत कारखान्याला पाटवणार असल्याची भूमिका कारखाना परिसरातील  दहा कि मी.अंतरातील उस उत्पादक शेतकर्यानी घेतली आहे.   
No comments:

Post a Comment