डूक्करवाडी येथे गवे,डूक्कराकडून पिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2020

डूक्करवाडी येथे गवे,डूक्कराकडून पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी

       डूक्करवाडी (रामपूर) ता .चंदगड येथील डूबा शेत व बेरडतळे नावाच्या  शेतातील ऊस,भात,भुईमूग, नाचना आदी पिकांचे जंगली डूक्कर व गवे या प्राण्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

       डूबा नावाच्या शेतालगत मोठ्या प्रमाणात जंगल असून या जंगलात गवे व डूक्कर मोर,लांडोर आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे.काल गेलेल्या काही शेतकर्यानी फटाकड्या वाजवल्याने जंगलातील जंगली गवे व रानटी डूक्करानी आवाजामूळे जंगला लगतच्या शेतात प्रवेश केला. पांडूरंग ढेरे, भिकाजी ढेरे, राजेंद्र जाधव,अमृत जाधव,प्रकाश जाधव,गजानन ढेरे,अर्जून ढेरे,मारूती ढेरे,तर बेरडतळे येथे प्रकाश गावडे,बाबू गावडे,गोविंद पाटील,गुंडू निकम,हरी निकम,नारायण निकम यांची  कापणीला आलेले भात व ऊस पिकांचे खाऊन व पिकात नाचून नुकसान केले.अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही,तोपर्यंत दूसर्या वेळेला पेरणी केलेली भात व नाचना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर बेरड तळे नावाच्या शेतात शेतातून काढून खळ्यावर वाळत घातलेल्या दोन पोती भूईमूगाच्या शेंगा गव्यानी फस्त केल्या. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.





No comments:

Post a Comment