एक हजार घरात ग्रंथ भेट देणार, तूर्केवाडी येथे कार्यक्रम
![]() |
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील कार्यक्रमात बोलताना ॲड. संतोष मळविकर, शेजारी गोपाळ ओउळकर सुभाष शिंगे. एच. के. नाळे, रामराव पाटील, विठ्ठल गावडे आदि.
ब्रम्हांडातील अकल्पनीय घटनांच्या मुळाशी जाऊन जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी व हिंदू धर्माची विचारधारा समजून घेण्यासाठी हिंदू धर्माचे महान ग्रंथ भगवद्गीता व ज्ञानेश्वरी प्रत्येक व्यक्तीच्या घरात असणे महत्वाचे आहे. दोन ते तीन महिन्यात एक हजार घरापर्यंत ज्ञानेश्वरी व भगवद्गीता हे दोन महान ग्रंथ पोहचवणार असल्याचा संकल्प ॲड. संतोष मळविकर यांनी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पदाधिकारी निवड कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष सुभाष शिंगे होते.
ॲड. मळवीकर पुढे म्हणाले, ``कोरोना कालावधीत भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हिंदू धर्माचे ज्ञान आणि जीवनातील सुख दुःखे, कर्म, कर्तव्य यांचा अमूल्य असा ज्ञानचा ठेवा सापडला.वकिलीला असताना भारतीय राज्यघटना आणि आता ह्या महान ग्रंथांनी जीवन सुखकर झाल्याचे जाणवते. नशीबवान लोकच हे ग्रंथ वाचू शकतात. सर्व लोकांपर्यंत हे ग्रंथ पोहचण्यासाठी मोठी चळवळ सुरू करणार असून घरोघरी हे ग्रंथ उपलब्ध करून देणार.
सुभाष शिंगे म्हणाले तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनता वाढत असून अध्यात्मिक मार्गानेच त्यांना योग्य मार्ग मिळू शकतो चंदगड तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात असून ज्ञानाचे भंडार आहे वारकरी संप्रदाय एक जुटीने राहिल्यास अनेक कुटुंबे सुखी होऊ शकतात.
जिल्हाध्यक्ष एच के नाळे म्हणाले, ज्यांनी भक्ती मार्ग अवलंबला त्यांनाच सुख सुखाची जाणीव झाली अन्यथा बाकीचा समाज प्रलोभना मूळे दुःखाच्या खाईत गेला. कार्यक्रमाचे नियोजन गोपाळ ओउळकर यांनी केले. प्रास्ताविक रुद्रा पाटील यांनी केले तर आभार शंकर नाईक यांनी मानले. यावेळी पुंडलिक पाटील, निलेश गावडे, दत्तू वाईंगडे, प्रकाश धामणेकर, ज्ञानेश्वर देवन, प्रकाश भोगूळकर, भरमू पाटील, नागोजी शिंदे यांच्यासह वारकरी व माळकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment