बोंजुर्डी येथे युवकाची पेटवून घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2020

बोंजुर्डी येथे युवकाची पेटवून घेऊन आत्महत्या

विजय कल्लाप्पा नाईक

चंदगड / प्रतिनिधी

     बोंजुर्डी (ता. चंदगड) येथील विजय कल्लाप्पा नाईक (वय-३९) या युवकाने दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली.

       विजय याला दारूचे व्यसन होते. काल बुधवारी रात्री दारूच्या नशेतच घरात कोणीही नसल्याचे पाहून अंगावर राॅकेल ओतून घेवून स्वताला पेटवून घेतले घेतले.या मध्ये तो गंभीर जखमी झालेने त्याला उपचारासाठी  बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार करून त्याला घरी आणले असता आज त्याचा मृत्यू झाला.याबाबत चंदगड पोलिसात सत्याप्पा नाईक यांनी वर्दी दिली. अधिक तपास हवालदार भदरगे करत आहेत. त्याच्या पश्चात आई  वडील, पत्नी, एक मूलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment