सरचिटणीसपदी निवडीबद्दल नागनवाडी येथे रविंद्र बांदिवडेकर यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2020

सरचिटणीसपदी निवडीबद्दल नागनवाडी येथे रविंद्र बांदिवडेकर यांचा सत्कार

सरचिटणीसपदी निवडीबद्दल  नागनवाडी येथे रविंद्र बांदिवडेकर यांचा सत्कार करताना चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, परशराम गावडे, संदीप कोकरेकर, विजय कडुकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर चंदगडकर.

चंदगड / प्रतिनिधी 

       भारतीय जनता पार्टी युवमोर्चाच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी रवीद्र नामदेव बांदिवडेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, परशराम गावडे, संदीप कोकरेकर, विजय कडुकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर चंदगडकर यांनी शाल,श्रीफळ पुष्पहार देऊन नागनवाडी ता.चंदगड सत्कार केला.

     भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी नागनवाडी (ता. चंदगड) येथील रवींद्र नामदेव बांदिवडेकर यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या सहीने तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  विक्रांत पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले आहे.काल चंदगड नरगपंचायतीच्या नगरसेवकांनी सत्कार करून त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment