चंदगड नगरपंचायतीसाठी भाडेतत्वावर पंचायत समितीची जुनी इमारत द्या, नगराध्यक्षा यांची पालकमंत्री पाटील यांचेकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2020

चंदगड नगरपंचायतीसाठी भाडेतत्वावर पंचायत समितीची जुनी इमारत द्या, नगराध्यक्षा यांची पालकमंत्री पाटील यांचेकडे मागणी

पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक अभिजित गुरबे,अशोक दाणी,कलाम मदार आदी.

चंदगड / प्रतिनिधी 

            चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्षपदी संभाजीराव देसाई -शिरोलीकर (रा शिरोली) याची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र देतांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री  सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी श्री. देसाई यांना दिले.

    यावेळी  कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व आजरा-गडहिंग्लज -चंदगड समन्वयक विद्याधर गुरबे, विक्रम सुरेशराव चव्हाण-पाटील, महादेव वांद्रे, जयसिंग पाटील, चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर, अशोक दाणी, उदय देसाई, जयवंत शिंदे, तुकाराम पाटील, पांडूरंग ल्हासे, रुक्माणा पाटील, शिवाजी यादव, नामदेव नार्वेकर, कलीम मदार, प्रसाद वाडकर सह  चंदगड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील दुरावलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून राष्ट्रीय काँग्रेस तालुक्यात मजबूत करणार असल्याचे निवडीनंतर संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment