चोरीला गेलेली इन्होव्हा गाडी राजस्थानातून दहा दिवसात हस्तगत, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांची कारवाई, - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2020

चोरीला गेलेली इन्होव्हा गाडी राजस्थानातून दहा दिवसात हस्तगत, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांची कारवाई,

 

     
इनोव्हा गाडी चोरीतील आरोपी समवेत पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहा. पोलीस निरीक्षक,सत्यराज घुले, संतोष पवार   पोलीस हेड कॉन्स्टेबल नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, पोलीस नाईक संजय चाचे, रणजीत कांबळे, विनोद कांबळे

 चंदगड /प्रतिनिधी : --- किणी ता.चंदगड  येथून चोरीस गेलेली इनोव्हा गाडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी फक्त दहा दिवसात शोधून काढून आरोपीच्या मुसक्या आढळल्या असून गाडीसह आरोपीस ताब्यात घेतले आहे. नरेश कंवरलाल खिचड (रा.खरा, ढोकोकी ढाणी, हनुमानपूरा, ता.फलोदी, जि.जोधपूर) या आरोपीस अटक करण्यात आली असून या प्रकरणी चंद्रकांत रामु हदगल (वय ४५, रा.किणी. ता.चंदगड, जि.कोल्हापूर) यांनी चंदगड पोलिसात तक्रार दाखल केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी कि  दि.२० सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान चंद्रकांत हदगल  यांची इन्होवा गाडी (एमएएच -०१- बीयु- ९३३६) ही त्यांच्या घरातील तळमजल्यात लावली होती. या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद चंदगड पोलीस ठाणे येथे दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या अनुसार वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला. त्यापैकी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ. पोलीस नाईक संजय चाचे व पोलीस कॉन्स्टेबल विनोद कांबळे यांचे पथकाला या गुन्ह्यातील चोरीस गेलेली इन्होवा गाड़ी ही नरेश कंवरलाल खिचड (जोधपूर) याने चोरून नेली असलेची माहिती मिळाल्याने.नरेशच्या मुळ पत्यावर राजस्थान येथे जावून खात्री केली असता तो  चोरीची इन्होवा कार घेवून जूना मुंबई-पूणे हायवे रोडलगत असले साई प्रसाद धाबा, कोनगाव (ता.पनवेल, जि.रायगड) येथे असलेची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जावून पोलिसांनी सापळा रचला  आरोपी नरेश कंवरलाल खिचड व त्याच्या ताब्यात असलेली इन्होवा कार  ताब्यात घेतली.पोलिसी खाक्या दाखवताच  आरोपीने गाडी चोरी केल्याचे कबूल केले. अधीक्षकशैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहा. पोलीस निरीक्षक,सत्यराज घुले, संतोष पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, पोलीस नाईक संजय चाचे, रणजीत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कांबळे व सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक अमर वासुदेव यांनी ही कारवाई केली. कारवाई बद्दल या पोलिस पथकाचे कौतुक होत आहे. 


No comments:

Post a Comment