कोवाड येथील महाविद्यालयात |
कोवाड सी एल वृत्तसेवा
कोवाड ता चंदगड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारशी आणि जैन या अल्पसंख्याक समाजातील एस.सी. एस.टी. एन.टी. ओबीसी.( पोस्ट मॅट्रिक) विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून स्कॉलरशिप ची योजनेची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे प्र प्राचार्य व्ही आर पाटील यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली असून त्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सदर स्कॉलरशिप प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आहे आणि जे विद्यार्थी मागील वर्षी शिकत होते त्यांनीही आपल्या स्कॉलरशिपच्या योजनेचे नूतनीकरण करनेचे आहे त्यासाठी पुढे दिलेल्या संकेतस्थळावर आपली संपूर्ण माहिती भरने आवश्यक आहे.
www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २० पर्यंत आहे तरी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२०/२१ या वर्षासाठी ज्याने प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज भरून एक प्रत महाविद्यालयात ऑफिस कडे देणे आहे. अधिक माहितीसाठी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. के. पी. वाघमारे आणि प्राचार्य डॉक्टर व्ही. आर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कॉलेजकडून करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment