ओलम हेमरस शेतकरी, कामगार वर्गाचा साखर कारखाना - भरत कुंडल, 11व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2020

ओलम हेमरस शेतकरी, कामगार वर्गाचा साखर कारखाना - भरत कुंडल, 11व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन कार्यक्रम

11 व्या गळीत हंगामाच्या प्रारंभी मोळी पूजन करताना ओलम अग्रोचे बिझनेस हेड भरत कुंडल व इतर मान्यवर.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा (संजय पाटील)

           चनेहट्टी - राजगोळी ता. चंदगड येथील ओलम अग्रो इंडिया प्रा.लि.चा २०२०-२१ च्या ऊस गळीत हगांमासाठीचा ऊस मोळी पूजनाचा कार्यक्रम ओलम अग्रोचे बिझनेस हेड भरत कुंडल याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंजिनिअरिंग हेड पी देवराजलू ,प्रोसेस हेड शशांक शेखर ,हेमरस युनियन सेक्रेटरी रवळनाथ देवन, युनियनचे अध्यक्ष संतोष गुरव प्रमुख उपस्थित होते.

काटा पूजन करताना केन हेड सुधीर पाटील व इतर मान्यवर

         प्रथमतः गणेश पूजन बिझनेस हेड भरत कुंडल व त्यांच्या सुविद्य पत्नी गीता कुंडल यांचे हस्ते झाले.केन हेड सुधीर पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. मागील वर्षीच्या उच्चांकी साडे सहा लाख टन गाळपाच्या यशस्वितेनंतर येत्या हगांमात साडे सात लाख टण ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ असुन त्यासाठी शेतकरी वर्गाने हेमरसलाच आपला ऊस पाठवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

           ओलम प्रशासनाने आजवर ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूकदार यांची बिले उपविभागात उच्चांकी दराबरोबरच वेळेत अदा केली असून मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील उशिरा तोडणी होणाऱ्या ऊसाला विशेष अनुदान देणार असून शासनाच्या सुधारीत एफआरपी  धोरणानुसार यावर्षीच्या सुरुवातीच्या तोडणीला 2985 रु दर हा एकरकमी देणार असल्याचे यावेळी कुंडल यांनी स्पष्ट केले. यावेळी पुढे बोलताना कुंडल म्हणाले,काही हितशत्रूनी काटामारी सह अनेक प्रकारचे मागील वर्षी आरोप केले तथापि या सर्व कसोट्यातून पार पडून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तज्ञामार्फत वेळोवेळी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन करत आलेलो आहोत .ओलम ऍग्रो ही कंपनी मल्टिनॅशनल कंपनी असून एकूण 92 देशामध्ये कार्यरत आहे.ओलम साखर कारखानाशेतकऱ्यांचा ,कामगारांचा ,वाहतुकदारांचा साखर कारखाना आहे,त्यामुळे ओलम प्रशासन नेहमीच या सर्व घटकांच्या हिताचा विचार करत आलेला आहे, तेव्हा शेतकरी वर्गाने सहकार्य करावे व आपला सगळा ऊस ओलमलाच पाठवावा असे आवाहन कुंडल यांनी केले आहे.

          यावेळी ज्योतिबा(आप्पा) वांद्रे, संतोष बेळगावकर,संजय कुट्रे, दयानंद पाटील,निगाप्पा पाटील, प्रवीण कोले या शेतकऱ्यांनी मनोगते मांडली. या कार्यक्रमाला मावळेश्वर कुंभार-राजगोळी(खुर्द) सरपंच, शिवाजी सडाके, राजगोळी-(बुद्रुक) सरपंच, जुबेर काझी -तळगुळी सरपंच, रामाणा गवळी-सुतगट्टी, बसनगौडा हुद्दार, सदस्य निगनहट्टी, रामा वांद्रे, ऋषिकेश पाटील, करियप्पा सजली, दयानंद ओऊळकर इ.ऊस वाहतूकदार व नामदेव पाटील अनिल पाटील, रंजीत सरदेसाई, भागोजी लांडे इ मान्यवर तसेच कार्यक्षेत्रातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment