चंदगड / प्रतिनिधी
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संभाजी मारुती कदम (हंदेवाडी, ता. आजरा) यांची तर प्रा. तानाजी चौगले यांची संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी निवड झाली. या वेळी संस्थेचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांच्या हस्ते डाॅ कदम यांचा तर डी. एड. कॉलेजच्या प्राचार्य बिनादेवी कुराडे यांचे हस्ते प्रा.चौगले यांचा सत्कार झाला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. कदम, पर्यवेक्षक प्रा. चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. एस. डी. पाटील, प्रा. किशोर अदाटे, संदीप कुराडे, रमेश आयरनाईक, डॉ.आनंद कुंभार, डॉ. बी. डी. अजळकर यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment