मायक्रो फायनान्सच्या वसुली तगाद्याविरोधात बुधवारी तहसिलवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2020

मायक्रो फायनान्सच्या वसुली तगाद्याविरोधात बुधवारी तहसिलवर मोर्चा

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील अनेक गावांतील महिलांनी मायक्रो फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कडून कर्ज वसुली साठी तगादा लावला जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी बुधवार १४ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १ वाजता चंदगड तहसिलदार कार्यालयावर भारतीय जनता युवा मोर्च्याच्या  जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्या येणार आहे. 

     सद्या कोरोना च्या काळात स सर्व उत्पनाचे स्त़ोत्र बंद असल्याने सर्वसामान्य माणसाला खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत असे असताना मायक्रो फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी लावला जात आहे, तो थांबला पाहिजे. यासाठी बुधवार दिनांक १४ क्टोबर २०२० रोजी दुपारी १ वाजता चंदगड तहसिलदार कार्यालयावर भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष मोर्चा काढला जाणार आहे. सौ. रत्नप्रभा जयंत देसाई यांच्या नेतृत्वाखाली काढला जाणार आहे असे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
No comments:

Post a Comment