पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे निषेध करताना मनसे कार्यकर्ते. |
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राज सुभेदार यानी केले. नागेश चौगूले यानी छत्रपती घराणे महाराष्ट्राची अस्मिता आहे. या घराण्यातील दोन्ही राजांविषयी ॲड. आंबेडकर आणि सदावर्ते यांनी टीका करताना असंस्कृतिक विधाने करून स्वत : चीच बेइज्जत करून दाखविली आहे. त्यांची विधाने निषेधार्ह आहेत. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरीब, दलित, पददलित, बहुजन समाजातील प्रत्येक वर्गाच्या विकासाचा विचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मागासवर्गीय बांधवांचा नेता म्हणून पुढे आणत दिशा देण्याचे कार्य केले. त्याच राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजांवर टीका करताना ॲड. आंबेडकर यांनी किमान भान बाळगणे आवश्यक होते. त्यांचे विधान, टीका पाहता ते डॉ. आंबेडकरांचे खरोखरच वंशज आहेत काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे, तर उपजिल्हाप्रमूख प्रताप उर्फ पिनू पाटील यानी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्यांचा अवमान करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी जयंत पाटील, युवराज यदुरे ,ज्ञानेश्वर धुरी, अविनाश पाटील, योगेश बल्लाळ, सागर हेरेकर, प्रवीण बेळगावकर, संतोष बारविलकर,संतोष शिंदे, ओमकेश पाटील, साई गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment