![]() |
पाटणे फाटा ता चंदगड येथे मनसेच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतांना जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, बाजूला उपजिल्हाध्यक्ष प्रताप पाटील,राज सुभेदार,जी. एन. पाटील आदी |
चंदगड / प्रतिनिधी
सामजिक कार्याची तळमळ हि रक्तात असावी लागते. केवळ राजकारण म्हणजे समाजकारण न्हवे तर सामान्याचे हित व सामाजिक बांधिलकी हे हि महत्वाचे आहे. केवळ राजकारणापूरते काम करणे आपणाला जमले नाही. चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून आंदोलने हाती घेतली म्हणून आज कित्येक प्रश्न मार्गी लागले. आणि यामध्ये खंबीरपणे वृत्तपत्रे हीच माझ्या कामाचा आरसा बनून पाठीशी उभी राहिलीआहेत. असे प्रतिपादन मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले यांनी केले. ते पाटणे फाटा येथे पक्ष संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रास्तविक राज सुभेदार यांनी केले.
चौगले पुढे म्हणाले ``चंदगड मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. अत्यावश्यक सेवा हि काही ठिकाणी नाहीत इतका मागासलेला मतदार संघ आहे. आणि हे चित्र बदलायचे असेल तर गावपातळीवरून सुरुवात हवी.`` यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले चंदगड तालुक्यात विकासाची वाणवा कायमच आहे. हा तालुका जरी निसर्गाने संपन्न असला तरी येथील गडकिल्ले आजही दुर्लक्षित आहेत. रस्त्यांचे प्रश्न यावर न बोललेलं बरं ,शासकीय यंत्रणा हि तुटपुंजी याच कारण एकच आहे. ते म्हणजे राजकीय लोकांचे अज्ञान आणि नाकर्तेपणा हे जर सुधारायच असेल तर प्रत्येक तरुणाने जागरूक झाले पाहिजे. तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रावर अंकुश ठेवला पाहिजे असे मत वेक्त केले.जी एन पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंत पाटील,युवराज यदुरे ,ज्ञानेश्वर धुरी, अविनाश पाटील, योगेश बल्लाळ, सागर हेरेकर, प्रवीण बेळगावकर, संतोष बारविलकर,संतोष शिंदे, ओमकेश पाटील, साई गावडे सचिन कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment