ऍन्टी करप्शन आणि ह्यूमन राईट्स मध्ये शोभा कोकीतकर यांची इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

ऍन्टी करप्शन आणि ह्यूमन राईट्स मध्ये शोभा कोकीतकर यांची इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून निवड

शोभा कोकीतकर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         एन्टी करप्शन फाउंडेशन आणि ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल मध्ये शोभा कोकीतकर यानी कोल्हापुर जिल्हा स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नॅशनल कोडिनेटर या पदावर घेण्यात आले होते.त्यानंतर त्यांची उत्तम कामगिरी व योग्य निर्णय यामुळे त्याना आता इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून पद मिळाले आहे योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय अध्यक्ष नरेंन्द्र अरोरा यानी त्यांची नियुक्ती केली आहे.

          2005 पासून समाजकार्याचे व्रत हाती घेतलेल्या कोकितकर यानी आरोग्य विभाग मध्ये सुरुवातीला व्हालंटरिज म्हणून काम केल,विशेष गटासाठी त्यातून त्यांना 5 तालुक्यासाठी ओआरडब्लू या पोस्टवर नियुक्ती केली गेली त्यावेळी त्यानी या कामाबरोबरच समुपदेशन ,सोशल स्किम, स्टिग्मा केसेस यासाठी उत्कृष्ट असे काम केले, अनाथ मुलाच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांनी सहकार्य केले या त्यांच्या कामाचे स्वरूप बघून त्यांना समुपदेशक पदावर नियुक्त केले गेले. त्या दरम्यान एसआरएचआर चे ट्रेनिग घेऊन एक वेगळ्या गटासाठी काम सुरु केले ते म्हणजे ह्यूमन राइट्सने.

           प्रत्येक व्यक्तीला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, भ्रष्टाचार थांबला पाहिजे कायद्याच्या कचोटित राहून समाजासाठी व गरजू असहाय्य लोकांना मदत करण्याचा मानस असल्याचे यावेळी शोभा कोकितकर यांनी स्पष्ट केले. या सर्व सामाजिक कार्यात त्यांना त्यांचा मुलगा सूरज यांचे पाठबळ मिळाले आहे. या  त्यांच्या उत्कृष्ट कामगिरिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शिवाय त्या सकल मराठा महासंघ च्या कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष म्हणून ही मराठा समाज्याचे नेतृत्व करत आहेत.

1 comment:

Unknown said...

Congratulations madam. Best of luck.

Post a Comment