शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा निषेध व विरोध करण्यासाठी शुक्रवारी धरणे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा निषेध व विरोध करण्यासाठी शुक्रवारी धरणे आंदोलन

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

      भांडवलदार धार्जिण भाजपा सरकारने पाशवी बहुमताच्या बळावर असंसदीय पद्धतीने आवाजी मतदानाने पास करून घेतलेल्या कृषि विधेयंक व कामगार विरोधी कायद्यांचा निषेध  व संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष नामदार सतेज (बंटी)पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात उद्या दिनांक 02 आॅक्टोंबर 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यात केंद्रीय भाजपा सरकारने संमत केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्या विरोधात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या निवेदना द्वारे गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुचित करण्यात येत आहे की उद्या आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात कोरोना संक्रमण न होण्याची योग्य ती काळजी घेत स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करत सोशल डिस्टंटिंगच पालन करत मास्कचा अगदी आवर्जून वापर करत काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत जगाचा पोशिंदा असणारया शेतकरयांचा व अर्थव्यवस्थेला चालना देणारया समस्त कामगार बांधवांचा आवाज बुलंद करण्यास हातभार लावावा असे कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणिस विद्याधर गुरबे यानी आवाहन केले आहे.No comments:

Post a Comment