हवालदार डी. एन. पाटील यांच्या बदलीनिमित्त लाडलक्ष्मीकार समाज व मळवी ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

हवालदार डी. एन. पाटील यांच्या बदलीनिमित्त लाडलक्ष्मीकार समाज व मळवी ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न

हवालदार डी. एन. पाटील यांना शिवरायांची प्रतिमा भेट देताना ग्रामस्थ. 

दौलत हलकर्णी / सी. एल. वृत्तसेवा

       पाटणे फाटा (ता. चंदगड ) येथील पोलीस चौकीचे पोलीस हवालदार डी. एन. पाटील यांची बदलीनिमित्ताने लाडलक्ष्मीकार भटका समाज पाटणे फाटा व मळवी ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ करण्यात आला.

        समाजातील गरजु व गरीबांना मदत करण्यामध्ये श्री. पाटील हे अग्रेसर होते. पोलीस ड्युटीवरील कर्तव्य बजावत असताना माणसातील माणुसकी जपुन त्यांनी वेळोवेळी तालुक्यातील गरजुं व्यक्तींना त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यापर्यंत पोहचले होते. चंदगड तालुक्यातील कर्तव्याचा कार्यकाल संपुण ते आता गडहिंग्लज येथे रुजु झाले आहेत. याप्रसंगी आनंद काबंळे, काशिनाथ कांबळे, बाबुराव पाटिल, सजंय फर्नाडिस, एकनाथ शिदे, शामु लाडलक्ष्मीकार उपस्थित होते.
No comments:

Post a Comment