राजगोळी खुर्द येथील ओलम कारखान्याच्या अकराव्या बाॅयलर प्रदीपन प्रसंगी कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल व अन्य मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ओलम (हेमरस) साखर कारखाना प्रशासनाने आत्तापर्यंत ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूकदार यांची बिले उपविभागात उच्चांकी व तत्परतेने आदा केल्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांसह सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरलो आहोत. या विश्वासार्हतेमुळेच ओलम कारखाना यंदा सात लाख टन गाळपाचा टप्पा पार करील असा विश्वास कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केला. ते राजगोळी खुर्द ता. चंदगड येथील ओलम ऍग्रो इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या (सन २०२०-२१) अकरावा गळीत हंगाम बाॅयलर प्रदीपन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अग्नि प्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे प्लांट हेड पी देवराजलू व सौ बी जयमनी यांच्या हस्ते झाला. शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले तर वरिष्ठ व्यवस्थापक अजिज झुंजानी यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना कुंडल पुढे म्हणाले आमच्या काही हितशत्रूनी कारखान्यावर काटामारी सह अनेक प्रकारचे आरोप केले तथापि या सर्व कसोट्या तून आम्ही पार पडलो असून आमची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे. उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांमार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना वर्षभर निरंतर मार्गदर्शन सुरू आहे. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. ओलम व्यवस्थापन, शेतकरी व कामगार हे एकाच कुटुंबाचे घटक असल्याची भावना आम्ही ठेवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ऑपरेशनल हेड शशांक शेखर, को-जनरेशन हेड बी आर योगेशा, कॅन हेड सुधीर पाटील, युनियन अध्यक्ष संतराम गुरव आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी हेमरस युनियनचे सर्व पदाधिकारी कार्यक्षेत्रातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment