चोरीतील संशयित आरोपी |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभय ग्रामीण पत संस्थेतील सुमारे सातशे पन्नास ग्रॅम वजनाच्या दागिन्याची पतसंस्थेचे कपाट मोडून लंपास केले होते या चोरीची घटना १२सप्टेंबर रोजी उघडकीला आली होती. पोलिसांनी अठराव्या दिवशी छडा लावला आणि तिघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यातील एक जन पत संस्थेचे दिवंगत संस्थापकाचा मुलगा आहे.
चोरी झालेल्या ठिकाणची पत संस्थेची इमारत |
चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभय ग्रामीण पत संस्थेतील कर्जदारांनी सोने तारण ठेवून काढलेलं सुमारे सातशे पन्नास ग्रॅम वजनाच्या दागीणे संस्थेच्या ला लाँकर मध्ये ठेवण्यात आले होते. दहा सप्टेंबर रात्री ते अकरा सप्टेंबर पहाटेच्या दरम्यान अज्ञातानी पत संस्थेच्या इमारतीच्या दरवाजामधून आत प्रवेश करून संस्थेचे कपाट गँस कटरच्या सहाय्याने कापुन कपाटातील सुमारे सातशेह पन्नास ग्रँम वजनाचे दागिने चोरले होते.या चोरीच्या प्रकारामुळे कोवाड-कर्यात भागात मोठी खळबळ माजली होती. पैकी पोलिसांनी तीनशे नव्वद ग्रँम वजनाचे विविध सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
कोल्हापूर अप्पर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने समांतर तपास करून हा गुन्हा उघडकीला आनण्यासाठी योजना आखली आणि दहा पोलीसांचे पथक करून ते तालुक्यातील पाठवले या पथकातील पोलिस हेड काँन्स्टेबल श्रीकांत मोहिते यांना एका कडून गोपनीय माहिती मिळाली. त्यात नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राहणारा मेहश उर्फ पिंटू सुबराव कोले (वय-३७) याचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलीस पथकाने त्याला चोरी केलेल्या सुमारे वीस लाख रुपये किंमतीच्या दागीण्या सह ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता आपल्या बरोबर सुनिल उर्फ जान्या रामा तलवार (वय-२२) रा. कोवाड (ता.चंदगड) व संतोष उर्फ राजु ज्ञानेश्वर सुतार(वय-२५) रा.चिंचणे (ता.चंदगड) मदतीला होते. आपण तिघांनी मिळून संस्थेच्या कपाटातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याचे कबुली दिली आहे. चंदगड पोलिसांत या बाबत १२ सप्टेंबर २०२० रोजी भा. द. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पो. नि. सत्यराज घुले, पो. हे. काँ. श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, विठ्ठल मणिकेरी, प्रदिप पवार यांच्या पथकाने या चोरीचा छडा आठरव्या दिवशी लावला. या कारवाईसाठी पो. अधिक्षक श्रीशैलेश बलकवडे, अप्पर पो. अधिक्षक तिरुपती काककडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. तानाजी सावंत इत्यादीं च्या मार्गदर्शनाखाली पथकात सहभागी झालेल्या सर्वानी छडा लावला.
No comments:
Post a Comment