चंदगड तालुक्यात "ओला दुष्काळ" जाहीर करा - प्रा. विजयभाई पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2020

चंदगड तालुक्यात "ओला दुष्काळ" जाहीर करा - प्रा. विजयभाई पाटील

                   

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यात ३१ में पासून ते सप्टेंबर महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत सलग पाऊस झाला या काळात शेती पिकांची मोठ्या प्रमाणात हाणी झाली असल्याने चंदगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे प्रा.विजयभाई पाटील यांनी केली आहे. याबाबत चे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे 

     चंदगड तालुक्यात ३१मे पासून ते सप्टेंबर महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत सलग पाऊस पडला आहे मधील काळात तर अतिवृष्टी,तसेच काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे त्यामुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे भात,ऊस,नाचणा,मका,भुईमूग,सोयाबीन या पिकांच्या बरोबर फळझाडांचेही नुकसान झाले आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचे जीवघेणं संकट,तर दुसरीकडे पावसाने झालेलं आतोनात नुकसान यामुळे शेतकरी पूर्णपणे खचलेल्या अवस्थेत आहे.त्यामुळे  शासनाने चंदगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे विजयभाई पाटील यानी निवेदनाद्वारे केली आहे. 
No comments:

Post a Comment