सडेगुडवळे येथील शंभर एकर सरकारी पड जमीनीवर अनाधिकृत कब्जा, दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

सडेगुडवळे येथील शंभर एकर सरकारी पड जमीनीवर अनाधिकृत कब्जा, दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा

दौलत हलकर्णी / सी. एल. वृत्तसेवा

    सडेगूडवळे (ता. चंदगड) सरकारी पड  जमिनी काही ग्रामस्थ व या ग्रामस्थांच्या संबंधित व्यक्तीनी ६२४ , ३६ ९ , ६४१,६४४ या गट नबंरातील १००एक्कर जमिन महसूल विभाागतील अधिका-यांना हाताशी धरूून ७/१२ पत्रकी विविध प्रकारचे फेरफार करून आपली नावे नोंदवली आहेत, या जमीन गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

        सडेगुडवळे गावालगत हजारो एक्कर  सरकारी पड जमीन आहे.या जमिनी गावातील तसेच बाहेरगावातील लोकांनी अनधिकृत पणे सदर गटनंबरचे ७/१२ दप्तरी विविधप्रकारचा फेरफार करून व त्यात बदल करूनआपली नावे करून घेतली आहेत तसेच जिल्हाधीकारी  यांनी दिलेल्या हेरे सरंजाम जमीन कायम हक्काने देण्याच्या निर्णयाचा फायदा घेऊन ७/१२ दफतरी पीकपाणी व जुनी वहिवाट अनधिकृत मार्गाने लावून सदर जमीन कायम हक्काने मिळवण्याचा प्रयत्न  सुरु आहे. यातील काही जमीन विक्री केलीआहे . तर यातील जमिनी मध्ये विक्रीचा प्रकार सुरु आहे असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेआहे.या गट नंबरमधील जमिनीत आजतागायत कोणत्याही प्रकारची पीक लागवड प्रत्यक्षात नसताना देखील बोअरवेल , भात , नाचना , आणि गवत याची पीकपाणी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे

            ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन एकमताने ग्रामसभेचा ठरावासह जमिन गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु आजतागायत  कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.सदर जमीन हि गावासाठी गायरान तसेच वृक्षलागवड करणेकरिता अत्यंत गरजेचे आहे . त्यामुळे  याप्रकरणी तातडीने लक्ष घालून सदर व्यवहार थांबवावेत व वरील गटनंबरची जमीन गावातील लोकांना सार्वजनिक उपाय योजनेसाठी उपलब्ध करून द्याव्यात ,व गैरकारभार करणा-या महसूल मधील कर्मचाऱ्यांच्यावर व ग्रामस्थांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. निवेदनावर  प्रकाश गावडे, तंटामुक्त अध्यक्ष  पुंडलिक गावडे, उपसरपंच प्रभावती गावडे, मनोहर गावडे, विठ्ठल झेंडे, रामदास झेंडे, लक्ष्मण फाटक, प्रभावती गावडे, सुनीता गावडे, जिवबा गावडे, संजय कांबळे, सुनील सावंत, सिताराम गावडे, सुनिल गावडे, यशवंत गावडे, दत्ताराम गावडे, तानाजी गावडे, विजय पाटील आदीसह ५००हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.   



No comments:

Post a Comment