चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रथम प्राधान्य देणार - दोड्डण्णावर, इको केन शूगरचा १४ वा बाॅयलर अग्नी प्रदीपन - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रथम प्राधान्य देणार - दोड्डण्णावर, इको केन शूगरचा १४ वा बाॅयलर अग्नी प्रदीपन

म्हाळुगे (ता. चंदगड) येथील इको केन साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदीपन करताना पृथ्वी दोड्डणावर, अरुण फरांडे, बाबासाहेब देसाई, प्रभाकर हुलजी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला या गाळप हंगामात  प्रथम प्राधान्य देणार आहे. कारखाना लवकर सूरू करणार असून तोडणी वाहतूक यंत्रणेच्या सुरक्षेच्या बाबतीत शासकीय नियमाप्रमाणेघालून दिलेल्या सर्व अटींचे पालन कारखाना करणार असल्याची माहिती इको केन शुगर एनर्जी लिमिटेड म्हांळुगे खालसा येथील साखर कारखान्याचे सीईओ पृथ्वी दोड्डणावर यांनी दिली. कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे सीईओ पृथ्वी दोड्डणावर यांचे हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे युनिट हेड व्ही. एस. देसाई, केन हेड व्ही. टी. कुलकर्णी व सदाशिव गडले, चिफ इंजिनियर डी. आर. हुक्केरी, डेप्युटी एच. आर. व्यवस्थापक प्रभाकर हुलजी, सर्व विभागांतील कामगार कारखान्याचे हितचिंतक तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी दोड्डणावर म्हणाले, ``सध्या कोरोना महामारीमुळे कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, शासनाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, सोशल डिस्टन्स पाळावे तसेच ज्याच्या तोंडावर मास्क नाही त्या कोणालाही कारखान्यात प्रवेश देऊ नये. कारखान्यासह आरोग्याला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे, कारखान्याचे व्यवस्थापक बाबासाहेब देसाई, जिल्हा  बँकेचे गोदाम व्यवस्थापक अनिल खोराटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment