आज १ ऑक्टोबर २०२० जेष्ठ नागरीक व रक्तदान दिन.
३० व्या जेष्ठ नागरीक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव सोमनाथ गवस (फेस्कॉम), ता. चंदगड, जि. कोल्हापूर यांनी जेष्ठ नागरीकांच्या विविध समस्याविषयी मांडलेला लेखाजोखा.
सोमनाथ गवस |
३० वा ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न झाला, पण कोरोनाचे सावटातही ज्येष्ठांची जगण्याची उमेद कायम आहे. ज्येष्ठांना घरपोच औषधोपचार करावेत संघटनांची मागणी, शासनाने ग्रामीण भागातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी.
जागतिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाची प्रथम जाणीव युनोला १९७3 साली झाली. ज्येष्ठांचे आयुष्यमान वाढत असलेची दखल आंतरराष्ट्रीय स्थरावर युनोनेच घेतली. वृद्धांचे जीवनमान कसे सुखकारक होईल. यावर उपाय शोधणेसाठी १९८२ साली व्हिएना येथे पहिली परिषद झाली. त्यामध्ये ६२ कल्याणकारी शिफारसी सर्व देशांना करण्यात आल्या. १४ डिसेंबर १९९० ला युनोच्या सर्वसाधारण सभेने दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ``ज्येष्ठ नागरिक दिन`` साजरा करण्याचा ठराव पास केला. त्यानुसार १ ऑक्टोबर १९९१ पासून संपूर्ण जगांत ``ज्येष्ठ नागरिक दिन" म्हणून साजरा केला जातो. आज हा दिवस ३० वर्षाचा झाला. ज्येष्ठांच्या प्रश्नासंबधी जनजागृती करणे, त्यांना संघटित करणे व जगण्याची उमेद वाढवुन आनंदी जीवन जगण्यास त्यांना प्रोत्साहित करणे. हा उद्देश ठेवुन ज्येष्ठ नागरीक दिन साजरा केला जातो. आज उपलब्ध आकडेवारीनुसार देशांत ११ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. ७० % ग्रामीण भागांत राहतात. त्यांतील 30 % दारिद्र रेषेखाली, 30% थोडेसे वर, काही हलाखीचे जीवन जगतात, फक्त १० % ज्येष्ठांना निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. ५०% ज्येष्ठ विधवा आहेत. ४८% ज्येष्ठांचे नातेवाईक रक्ताची नाती, कुटुबांत मानसिक छळ करतात. २०% ज्येष्ठ एकाकी जीवन जगतात. अशी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ही वसुस्थिती समाजाला शासनाला समजावी. ज्येष्ठांचा छळ उपेक्षा याला आळा बसावा, यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. त्यांतील महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) ही मातृसंस्था कार्य करते.
ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून त्यांना शासनाने समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी. वृद्धापकाळ सन्मान अनुदान द्यावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात-आठ महिने ज्येष्ठांना फार त्रासाचे जीवन जगावे लागते आहे. एकत्रित येणे, सुसंवाद साधणे, घराबाहेर पडणे, यावर निर्बध्द आले आहेत. बाधित ज्येष्ठांचे मृत्यूचे प्रमाण अधिक वाढते आहे. हि चिंत्तेची बाब आहे. असे असले तरी राज्यांत संघटित ज्येष्ठांनी आपापल्या स्तरावर शासनाच्या नियमाचे पालन करून मोबाईल / इंटरनेट अॅपद्वारे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला. पूर्वीप्रमाणे उत्साह चैतन्य आणी उमेद कायम ठेवून ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला. राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांना ज्येष्ठ नागरिक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment