तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबर ला सुरू करण्याचा शासनाचा आदेश आहे. यानुसार संबधीत इयत्ता ९वी ते १२ पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांची कोविड टेस्ट करण्याचा आदेशही देण्यात आला होता. या आदेशामूळे कोल्हापूर जिल्हयातील सर्वच कोविड सेंटरवर प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामूळे पून्हा या आदेशामध्ये बदल केल्याने शासनाच्या रोज बदलणाऱ्या या आदेशांचा सावळा गोंधळ दिसून येत आहे.
या अगोदरच्या आदेशामध्ये दि .१७ ते २२ नोव्हेंबर पर्यंत रोज १०५ शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात यावी असा आदेश होता. पण तो आदेश स्पष्ट नसल्याने प्रत्यक्षात यापेक्षा अधिक लोकांची कोविड सेंटरवर गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. याला कोविड सेंटरचे व शिक्षण विभागाचे नियोजन अपूर्रे पडले. गर्दीवर व गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर कोविड टेस्ट थांबविण्याचा तोंडी आदेश देण्यात आला. पण आज पुन्हा नवीन आदेश काढण्यात आला. यानुसार २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत प्रत्येक माध्यमिक शाळेतील रोज एका कर्मच्याऱ्याने स्वैब देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सर्वामुळे शासनाच्या या आदेशाने गोंधळ निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment