![]() |
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे ई-स्टोअर इंडियाच्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील व इतर. |
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे ग्राहकांच्या आग्रहाखातर ई-स्टोअर इंडियाच्या शाखेचे उद्घाटन अनिल जाधव (नॅशनल प्रमोटर) व संजना परांजपे (साऊथ इंडिया प्रमोटर) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील होते.
माणसाला रोजच्या जीवनातील लागणाऱ्या सर्वच वस्तु इतरांपेक्षा स्वस्त देण्याचा प्रयत्न असुन ग्राहकांना चागंली सेवा देणार असल्याची माहिती ई-स्टोअर इंडियाचे प्रोप्रायटर दिलीप पाटील यांनी दिली.यावेळी माजी सभापती शांताराम पाटील, भरमाना गावडा, शिवाजीराव सावंत, स्वप्नील गावडे, मनेश नाईक, सचांलक सुभाष जाधव व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment