चंदगड येथे शनिवारी साप्ताहिक, न्युज पोर्टल, टुर्स व यु-ट्युब चॅनलचा शुभारंभ कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2020

चंदगड येथे शनिवारी साप्ताहिक, न्युज पोर्टल, टुर्स व यु-ट्युब चॅनलचा शुभारंभ कार्यक्रम

चंदगड / प्रतिनिधी

        साप्ताहिक रोखठोक आवाज व न्युज पोर्टल, अ हेवन इंटरनॅशनल टुर्स, ॲड. संतोष मळवीकर यु ट्युब चॅनल या सर्वांचा उद्घाटन सोहळा शनिवारी २१ नोव्हेबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता चंदगड येथील शिवनेरी कार्यालय चंदगड येथे आयोजित केला आहे. याबाबतची माहीती संयोजक व संपादक ॲड. संतोष मळवीकर व सौ. संज्योती मळवीकर यांनी दिली.

        या संयुक्त कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, गोपाळराव पाटील, विजय देवणे उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील अध्यक्ष म्हणुन उपस्थित असतील. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सर्व आजी, माजी जि. प. व पं. स. सदस्य तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनिल गावडे व परशराम मळवीकर यांनी केले आहे. 
No comments:

Post a Comment