ऐन दिवाळीत बँक ऑफ बडोदाचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2020

ऐन दिवाळीत बँक ऑफ बडोदाचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय

दिवाळीमध्ये बंद होते ते एटीएम.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

        हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम ऐन दिवाळी सणामध्ये बंद असल्याने नागरीकांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे असून अडचण व नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
        हलकर्णी परीसरात राष्ट्रीकृत बॅंक म्हणुन बऱ्याच वर्षापासुन देना बँक हलकर्णी फाटा येथे कार्यरत आहे. बँकेचे विलीनीकरण  बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना चागंल्या सुविधा मिळतील अशा आशा होत्या. नागरीकांच्या सेवेसाठी परीसरात या बँकेचे हे एकच एटीएम आहे. पण काही दिवसापासून हे एटीएम असून अडचण व नसुन खोळंबा असे झाले आहे. कधी पैसै नाहीत म्हणुन तर कधी तांत्रिक अडचण म्हणुन आठवड्यातील तिन ते चार दिवस बंदच असते.
        सध्या दिवाळी सण सुरू आहे. मुबंई, पुणे व इतर बाहेरगावी असणारे चाकरमानी गावी आले आहेत. खरेदीसाठी किंवा इतर कारणासाठी पैशासाठी एटीएमकडे आले असता ते बंद असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हलकर्णी फाटा तसेच पाटणे फाटा येथे मोठी बाजारपेठ असल्याने लाखों रूपयांची उलाढाल होत असते. पण सतत एटीएम बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तेव्हा संबंधित बँकेने एटीएम सुरू ठेऊन नागरीकांची सोय करावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या ठिकाणी आनखी एकाद्या बँकेचे एटीएम सुरू करावे अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment