निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2020

निवेदनकालकुंद्री /सी. एल. वृत्तसेवा

रामोशी, बेरड, बेडर समाज हा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक व छ. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या आदर्शावर चालणारा आहे. तथापि महाराष्ट्रातील हा क्रांतिकारी समाज सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्ट्या मागास असून शासनाच्या विकासात्मक व कल्याणकारी योजनांपासून दूरच आहे. महाराष्ट्रात बेरड व रामोशी लोकसंख्या सुमारे २५ ते ३० लाख आहे.

महाराष्ट्रातील १९९९ च्या इदाते समिती अहवालानुसार रामोशी समाजातील ७५% लोक भूमिहीन तर ९६% कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राजे उमाजी नाईक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. या आशयाचे निवेदन देवून तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब करण्यात आले. यावेळी समाज बांधव व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
No comments:

Post a Comment