कोवाड कॉलेजच्या प्रा. आर. टी. पाटील शिवाजी विद्यापीठाकडून कलर ॲवार्डने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2020

कोवाड कॉलेजच्या प्रा. आर. टी. पाटील शिवाजी विद्यापीठाकडून कलर ॲवार्डने सन्मानित

शिवाजी विद्यापीठाकडून प्रा. आर. टी. पाटील यांचा कलर अवार्ड देऊन सन्मान करताना क्रीडा संचालक डॉ. पी. टी. गायकवाड

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा आर. टी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाच्या नामांकित कलर अवार्डने सन्मानित करण्यात आले.

        सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील, आखिल भारतीय विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघांचे मार्गदर्शक म्हणून प्रा. आर.टी. पाटिल यांची निवड झाली होती. यास्पर्धा मोडबिद्री कर्नाटक येथे पारपडल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शना खाली शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण पदक मिळाले होते. त्यांच्या या कार्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे क्रीडासंचालक डॉ. पी. टी. गायकवाड याच्या हस्ते विद्यपीठाचे सन्मान चिन्ह आणि ब्लेझर देऊन गौरविण्यात आले.

         आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यानी  जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीपर्यंत यश संपादन केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटिल, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील आणि संस्था पदाधिकारी यांचे प्रोच्छाहन मिळाले असून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment