दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जमाफी संदर्भात 14/10/2020 रोजी चंदगड तहसीलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 9/11/2020 रोजी अडकूर तालुका चंदगड येथील एसटी स्टँडवर परिसरातील 3000 महिलांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. रत्नप्रभा जयंत देसाई यांनी दिली आहे. यावेळी सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थित राहून कर्जमाफी बददल ठोक आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देखील या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
महाभयंकर कोरोना रोगाच्या सावटाखालो असताना घरचा संसार सांभाळताना महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडून त्या महिला आत्महत्या सारख्या गोष्टीकडे वळत आहेत. तेव्हा पालक मंत्री यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी उपस्थित राहून ठोक आश्वासन द्यावे. अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही असे सौ. रत्नप्रभा देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment