तिलारी येथील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2020

तिलारी येथील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

 तिलारी येथील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देताना पदाधिकारी. 

चंदगड / प्रतिनिधी

           तिलारीनगर (ता. चंदगड) येथील महा निर्मिती कार्यालयात रोजदांरी माळी असलेले बाबू बिरू गावडे (रा.बिदरमाळ,धनगरवाडा) या कर्मच्याराचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यामुळे महा निर्मिती कार्यालयातील कर्मचार्यानी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिवाळीच्या पूर्वसंध्येला  कार्यकारी अभियंता बी एम शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणाचारी, सोमनाथ गोडसे व इतर कर्मचारी यानी कै.गावडे यांच्या घरी जाऊन रोख पंचवीस हजार रूपये  व फराळ व किराणा सामान देऊन मानसिक आधार दिला. कै. गावडे हे त्या कुंटूबियाचा कर्ता पुरुष होता. त्यांच्या आकस्मिक  जाण्याने कूटूबांचा आधारच हरवला होता. त्यामुळे महा निर्मिती कार्यालयातील कर्मचार्यानी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. कै. बाबू गावडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुलं असा परिवार आहे.
No comments:

Post a Comment