रोखठोकच्या वक्तृत्व स्पर्धा आता २७ व २८ जानेवारीला - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

रोखठोकच्या वक्तृत्व स्पर्धा आता २७ व २८ जानेवारीला

चंदगड / प्रतिनिधी 

      साप्ताहिक रोखठोक आवाज चंदगडच्या वतीने २९ व ३० डिसेबंर २०२० रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वत्कृत्त्व स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तसेच सध्या चंदगड तालुक्यात ग्रामपचांयतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असल्याने  पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रोखठोक आवाजचे संपादक अॅड. संतोष मळवीकर यांनी दिली.
           कोरोना काळात लॉकडाऊनमुळे वत्कृत्व स्पर्धा झाल्या नव्हत्या त्यामुळे बऱ्याच स्पर्धकांना ईच्छा असुण देखिल आपले वत्कृत्व सादर करता आले नाही. म्हणुनच नव्यानेच सुरू झालेल्या साप्ताहिक रोखठोक आवाज व रोखठोक आवाजच्या माध्यमातुन दि. २९ व ३० डिसेबंर रोजी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते.कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर ह्या स्पर्धा २७ व २८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत.
No comments:

Post a Comment