![]() |
लक्ष्मण आडाव |
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कर्मचारी संघटना ( आयटक) दुध शित करण केंद्र तावरेवाडी (ता. चंदगड) च्या अध्यक्षपदी व कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी लक्ष्मण यशवंत आडाव (कोवाड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गोकूळ (आयटक) चे जनरल सेक्रेटरी संजय सद्लगेकर, शाहीर सदाशिव निकम, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, मल्हार पाटील, संजय देसाई, राजेंद्र नांदवडेकर, शरद पाटील, रविंद्र कोकरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment